हरतालिकेच्या दिवशी जुळून आला खास योग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, आजचं राशीभविष्य वाचा सविस्तर....
हरतालिकेच्या दिवशी जुळून आला खास योग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, आजचं राशीभविष्य वाचा सविस्तर....
img
DB
आज 18 सप्टेंबर, सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. यादिवशी शिव शंकराची आराधना करणं लाभदायक ठरेल. हरतालिकेच्या दिवशी जुळून आला खास योग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
 
मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

तूळ : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.जुनी येणी वसूल होतील.

 कुंभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.आरोग्य उत्तम राहील.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group