मेष ते मीन सर्व12 राशींचे साप्‍ताहिक आर्थिक राशिभविष्य ; जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
मेष ते मीन सर्व12 राशींचे साप्‍ताहिक आर्थिक राशिभविष्य ; जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
img
Dipali Ghadwaje
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - नोकरी- व्यवसायात प्रगती
या आठवड्यात मेषसाठी नोकरी- व्यवसायात प्रगती, मिथुन राशीचा कामात फोकस महत्त्वाचा,कन्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील.मकर राशीच्या लोकांनी प्रोजेक्टसंदर्भात बॅकअप प्लॅन ठेवा तर मीनसाठी धनलाभाचा योग आहे. तुमची राशी काय सांगते? तुमची कामे होणार की थांबणार? काय आहेत ग्रहांचे संकेत, चला तर, जाणून घेवूया मेष ते मीन राशींसाठी साप्ताहिक आर्थिक आणि करिअर राशिभविष्य कसे असेल.

मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - नोकरी- व्यवसायात प्रगती
या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात उत्तम प्रगती आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या काळ अनुकूल असून धनलाभाच्या चांगल्या संधी मिळतील. तब्येतीत सुधारणा असेल फक्त आहार आणि आरामाकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात समतोल राखल्यास आयुष्यात सुख-समृद्धीचे योग जुळून येतील. कुटुंबात सुख-शांती मिळवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात अनेक संधी मिळतील. या आठवड्यात तुम्ही अशा ठिकाणी प्रवासाला जाण्याचा विचार कराल, जिथे तुम्ही खूप काळापासून जाण्याचा विचार करत होता पण काही कारणामुळे तो प्रवास रद्द होवू शकतो.आठवड्याच्या शेवटी एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावा वाढू शकतो.

वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्टमध्ये यश, संवाद साधणे महत्त्वाचे
आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असून धनलाभाच्या संधी आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाची चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होईल आणि प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधात नाते अधिक वृद्धींगत होईल तसेच तुम्हाला सुखद अनुभव येतील. या आठवड्यात तब्येतीवर सुधारणा आहे तसेच आहार आणि आरामाकडे लक्ष द्या. कुटुंबात सुख-शांती कायम असेल तसेच एकप्रकारे तुम्हाला समाधानाची अनुभूती होईल. या आठवड्यात प्रवास टाळणे चांगले असेल, अन्यथा मानसिक त्रास वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी संवादातून  गोष्टी सोडवल्यास सर्व काही व्यवस्थित होईल.

मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - कामात फोकस महत्त्वाचा
ऑफिसच्या कामात प्रगती असून तुम्ही जितके अधिक लक्ष केंद्रित करून काम कराल, तितके अधिक यशस्वी होणार आहात. आर्थिक बाबतीत भावनिक कारणांमुळे खर्च वाढू शकतो. प्रेमसंबंधात थोडे धाडस करून निर्णय घेतल्यास सुखाची अनुभूती होईल. या आठवड्यात तब्येतीत सुधारणा असेल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासातून यश मिळेल. खरेदीचा योग असून तुम्ही घरासाठी भरपूर खरेदी करणार आहात. आठवड्याच्या शेवटी एखाद्या महिलेच्या मदतीने आयुष्यात सुख-समृद्धीचे योग जुळून येतील.

कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रवासातून लाभ
नोकरी असो वा व्यवसाय ठिक ठिक यश मिळेल, पण बोलण्याने तुम्ही अनेक बाबतीत परिस्थिती सुधारू शकता. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा चांगला असून मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल आहे पण धनसंपत्तीच्या बाबतीत तुम्ही कोणाला आश्वासने दिली असतील तर ती पूर्ण होणार नाहीत. तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा पोटाचा त्रास वाढू शकतो. या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या पितृतुल्य व्यक्तीबद्दल मन अस्वस्थ राहणार आहे. या आठवड्यात प्रवासाच्या अनेक संधी मिळतील आणि प्रवासातून चांगला लाभ होईल. आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचे शुभ योग आहेत.

सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार नाही
आर्थिक बाबतीतही या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळणे योग्य असेल. नोकरी किंवा व्यवसायात थोडा त्रास आहे, तसेच तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार नाहीत. हा आठवडा कार्यक्षेत्रासाठी कठीण राहील कारण तुम्हाला ज्या प्रकारचे बदल हवे आहेत ते सध्या मिळणार नाहीत. प्रेमसंबंधात सुख समृद्धीचे योग असून जोडीदारासोबत फिरायला जाणार आहात. कुटुंबात वातावरण सुख समाधानाचे असेल. कुटुंबाच्या सान्निध्यात सुखद वेळ घालवणार आहात. या आठवड्यात प्रवास पूर्णपणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. तब्येत ठिक असेल पण आराम आणि आहार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र परिस्थिती चांगली असेल. चक्क दोन पर्याय समोर येतील आणि सुख समृद्धीचे मार्ग खुले होतील.

कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील
या आठवड्यात नोकरी अन् व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत, तुम्हाला काहीतरी नवीन संधी मिळेल त्याचा फायदा घ्या. प्रोजेक्टच्या यशामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. तब्येतीमध्ये बरीच सुधारणा होईल आणि तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल कराल. या आठवड्यात तुम्ही काही बदल करणार आहात जे सकारात्मक असतील. प्रेमसंबंधात जुन्या आठवणी ताज्या होतील, लव्हलाइफ रोमँटिक असेल. आर्थिक बाबतीत खर्चाची परिस्थिती निर्माण होते आहे एखाद्या महिलेवर जास्त खर्च होऊ शकतो. कुटुंबातही महिला वर्गाबद्दल तुम्ही काळजी करणार आहात. काही प्रश्न बोलून सोडवता येतात, याचा नक्की विचार करा. या आठवड्यात प्रवास न केल्यास चांगले असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत सुखद वेळ घालवणार आहात.

तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रवास सुखाचा, धनसंपत्ती वाढेल
हा आठवडा प्रवासासाठी चांगला आहे, तुम्ही प्रियजनांसोबत प्रवास करू शकता किंवा कोणत्याही विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी प्रवास करणार आहात. प्रवास सुखद असून मधुर आठवणींनी भरलेला असेल. आर्थिक बाबतीत चांगली परिस्थिती असेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला या आठवड्यात धनसंपत्ती बाबत सुखद बातमी मिळेल. प्रेम संबंधात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तेव्हाच प्रेम दृढ होईल. नोकरी, व्यवसायात बोलण्याने परिस्थिती सुधारल्यास उत्तम आहे अन्यथा तुम्हाला वेगळा मार्ग स्विकारावा लागेल. कुटुंबात विनाकारण वादविवाद टाळा ते चांगले असेल. तब्येतीबद्दल मन अस्वस्थ असेल तसेच थोडी चिडचिड वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक होऊन निर्णय घेतल्यास जीवनात सुखी होईल.

वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - यशाच्या मार्गाने वाटचाल
नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे योग आहेत, एखाद्या महिलेच्या मदतीने प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होईल. तुम्ही यशाच्या मार्गाने वाटचाल करत आहात. आर्थिक बाबतीत सुधारणा असून धनवृद्धीचे योग आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेवून गुंतवणूक केली तर लाभ मिळेल. लव्हलाइफ रोमँटिक राहील आणि आपसातील प्रेम वाढेल. कुटुंबातही समाधानाचे वातावरण आहे. प्रियजनांच्या सान्निध्यात सुखद वेळ घालवणार आहात. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात एक नवीन सुरुवात होते आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात शांतता येईल आणि मन प्रसन्न राहील. तब्येतीकडे लक्ष द्या आणि प्रवास करणे शक्यतो टाळा. आठवड्याच्या शेवटी ताण वाढू शकतो त्यामुळे सतर्क राहा.

धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्टमध्ये बाह्य हस्तक्षेप टाळा
प्रेमसंबंधात वेळ अनुकूल असून प्रेम दृढ होईल. लव्हलाइफमध्ये आनंद आणि समाधान आहे. कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुम्ही जी काही मेहनत कराल त्याचे शुभफल भविष्यात मिळणार आहे त्यामुळे मागे होवू नका. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून सुखद फल प्राप्त होईल आणि मन प्रसन्न असेल. तुमचा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा असे वाटत असेल, तर कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप प्रोजेक्टमध्ये नको. आर्थिक त्रास या आठवड्यात राहतील आणि खर्च अधिक होऊ शकतो. तब्येतीच्या बाबतीत चढ-उतार राहतील. कुटुंबात अहंकाराचे वारे वाहणार आहेत त्यामुळे वादविवादाची शक्यता आहे. तुम्ही घराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनातील कोणत्याही नवीन बदलामुळे खूप तणावात असाल.

मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्टसंदर्भात बॅकअप प्लॅन ठेवा
कामाच्या ठिकाणी प्रगती असून मान सन्मानही वाढेल. सहकाऱ्यांकडून आदर मिळेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत संयमाने निर्णय घेतल्यास सुखी राहणार आहात. तसेच लव्ह लाइफ रोमँटिक होईल. प्रवासादरम्यान पार्टी मूडमध्ये असून एखाद्या विवाहसमारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात समाधानी वातावरण असून जीवन आनंद असेल. आर्थिक बाबतीत तुम्ही काही ठरवलं असेल तर तसे शक्यतो होताना दिसणार नाही, म्हणून बॅकअप प्लॅन तयार ठेवा. तुमच्या बॅकप्लॅनमुळे धनलाभाची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी सुख शांती आणि समाधानाची अनुभूती होणार आहे.

कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य
इच्छेनुसार प्रोजेक्टमध्ये बदल होणार कामाच्या ठिकाणी प्रगती असून तुमच्या इच्छेनुसार प्रोजेक्टमध्ये बदल होतील. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहेत, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंध यांच्यासंदर्भात आठवडा चांगला आहे. तब्येतीमध्ये सुधारणा आहे. कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याबद्दल मन अस्वस्थ राहील. प्रवास करताना काळजी घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारणार आहे पण एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ राहू शकते.
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य - धनलाभाचा योग, प्रोजेक्टमध्ये फोकस हवा
आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. घर सजावटीच्या वस्तू खरेदी करणार आहात. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल तसेच सहलीचा प्लॅन करु शकता. प्रवास यशस्वी होणार असून त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंधात एखाद्या महिलेमुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी प्रोजेक्टवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे




इतर बातम्या
Join Whatsapp Group