आजचा दिवस असणार 'या' राशीसाठी खास..! पाहा, तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते?
आजचा दिवस असणार 'या' राशीसाठी खास..! पाहा, तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते?
img
Dipali Ghadwaje
आज 4 जुलै 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य  जाणून घ्या.

मेष रास 
मेष राशीच्या लोकांनो आज स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही कामाला लावाल घरामध्ये खिलाडू वृत्तीने वावराल  

वृषभ रास 
वृषभ राशीच्या लोकांनो आज मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे, कीर्ती प्रसिद्धीचे योग येऊ शकतात  

मिथुन रास 
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरीत बदल करायचा आहे, त्यांनी विचार करायला हरकत नाही  

कर्क रास  
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत कष्टदायक अनुभव येतील, आता तोंडाशी आलेल्या पैशाच्या संधी खेचून आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील 

सिंह रास 
सिंह राशीच्या लोकांनो खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या म्हणीनुसार तुमच्या आचरण होईल 

कन्या रास  
कन्या राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे बेत होतील,  महत्त्वाच्या  कामासाठी लागणारी कागदपत्रे ही लवकरच तयार होतील    

तूळ रास 
तूळ राशीच्या लोकांनो आज भावनांशी चांगले संगनमत करावी, घरासाठी थोडाफार खर्च करावा लागेल.

वृश्चिक रास  
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज रोज भेटणारी सहकारी एखाद्या कामासाठी चांगले सहकार्य देतील आणि अडलेली कामे सहज होऊन जातील 

धनु रास 
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल, मनुष्य स्वभावाचे उत्तम निरीक्षक बनाल 

मकर रास 
मकर राशीच्या लोकांनो आज लोकांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे तुम्ही जाणताच, परंतु अशा लोकांना योग्य वेळी संधी द्यायला तुम्ही मागेपुढे पाहणार नाही.   

कुंभ रास 
कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक घडी म्हणावी अशी न बसल्यामुळे विचारात पडेल, परंतु अस्थिर व्हायचं कारण नाही लवकरच पैशाची कामे होतील 

मीन रास 
मीन राशीच्या लोकांनो आज प्रेमात पडलेल्या लोकांना जोडीदाराचा सहवास मिळेल, वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील.
 
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर  कोणताही दावा करत नाही.)
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group