IAS होण्याचं स्वप्न भंगलं!  एफडीए निरीक्षकाची आत्महत्या
IAS होण्याचं स्वप्न भंगलं! एफडीए निरीक्षकाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
नागपूर : आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका हॉटेलच्या खोलीत या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्व प्रकार समोर आला. शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मृत अधिकारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी असून, ते मित्राला भेटायला नागपूरला आले होते. त्यानंतर एका हॉटेलच्या खोलीत त्यांनी  स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आएएएस किंवा आयपीएस न झाल्याची खंत सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली आहे. यामध्ये त्याने लिहलं की, "मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. मी आयएएस, आयपीएस होऊ शकलो नाही. याची मला खंत आहे", असे चिठ्ठीत लिहिले आहे. 

भम सिद्धार्थ कांबळे (वय 25, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे.  याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

SUSIDE | FDA |
इतर बातम्या
Join Whatsapp Group