महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या "त्या" घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राला हादरवणारे कोपर्डी हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृत तरुणाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पीडित निर्भयाचे नातेवाईकही आरोपींमध्ये सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नग्न करून स्मशानभूमीत बसवल्याने अपमानित झाल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर कर्जत- कोपर्डीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचा हा चुलत भाऊ आहे. कोपर्डी प्रकरणात पप्पूला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याने तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या पप्पूचा नितीन चुलत भाऊ आहे. महत्त्वाचे म्हणजे पप्पूच्या घरी म्हणजे आपल्या चुलत्याच्या घरी नितीनने आत्महत्या केली आहे.   

कोपर्डी हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातले कुप्रसिद्ध अन् विकृतीचा कळस गाठलेले हत्याकांड म्हणून चर्चेत आले होते. १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करुन तिचा खून केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.  
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group