मोठी बातमी : संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
मोठी बातमी : संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प.शिरीष मोरे महाराज (देहूकर) यांनी आयष्य संपवले. प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे.  या घटनेमुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार , घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले आहे, चौकशी सुरू करण्यात आली आहे. देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. महाराजांचा नुकताच टीळा देखील झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह सोहळा होता.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय.

२० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. हभप शिरीष महाराज हे प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार त्याचप्रमाणे शिवव्याख्याते देखील होते. या घटनेने मोरे कुटुंबियांसह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group