मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी;   उपोषणास बसलेल्या तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; उपोषणास बसलेल्या तरुणाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
 नांदेड : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीत कायम अग्रेसर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील नायगाव येथील एका व्यक्तीने गळफास लाऊन आत्महत्या केली होती. अशातच नांदेड जिल्ह्यातील कामारी (ता. हिमायतनगर) येथे काही मराठा समाज बांधव उपोषणास बसले होते. मात्र आरक्षण मिळत नसल्याने उपोषणास बसलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारीकर असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी सुदर्शन कामारीकर हे गावातील सहकार्यासोबत गावात उपोषणास बसले होते. मागील दोन दिवसांपासून उपोषण सुरु होते. उपोषण सुरु असताना सुदर्शन याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने रात्री गुरांच्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी देखील लिहल्याची माहिती आहे. मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे असे स्पष्टपणे सुसाईड नोट मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान या घटनेनंतर कामारी गावातील मराठा आंदोलनाच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. याशिवाय सुदर्शन देवराये याचेही फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group