नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग करून नफा कमविण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह तिच्या साथीदारांनी अनेकांची 1 कोटी 62 लाख 87 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व इतर साक्षीदारांशी संशयित सुस्मिता शर्मा, अनिष मॅथ्यू व त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांनी संपर्क साधला. फिर्यादी व साक्षीदारांना क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग करून भरपूर नफा कमविण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व साक्षीदारांनी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे 1 कोटी 62 लाख 87 हजार 650 रुपयांची गुंतवणूक केली; मात्र मूळ रक्कम व त्यावरील नफा मिळाला नाही. यावरून फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. हा प्रकार नोव्हेंबर 2025 ते दि. 17 जुलै 2026 दरम्यान ऑनलाईन इंटरनेटद्वारे घडला.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.