विधानसभा निवडणुकांचा धुराळा: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर....
विधानसभा निवडणुकांचा धुराळा: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर....
img
Dipali Ghadwaje
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17,  नोव्हेंबर,  राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी 3 डिसेंबरला  होणार आहे. 

पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी  करणाऱ्यांमध्ये  महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात  आली आहे.  ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे.

लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता  लागू करण्यात येणार आहे.   मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि  और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.  

कोणत्या राज्यात कधी मतदान?  
  1. मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान 
  2. छत्तीसगड - 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान  
  3. मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान 
  4. राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी  मतदान  
  5. तेलंगाणा -  30 नोव्हेंबर रोजी मतदान
  6. पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी
17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार
17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे.  17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group