आत्ताच एक महत्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. लोकसभेचे १८ वे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संयुक्त अधिवेशन होणार आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हे अधिवेशन होणार आहे.
संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार हिवाळी अधिवेशनाबाबत केंद्रीय सांसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची ट्विट करुन माहिती दिली आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे. या ट्विटमध्ये लिहिले की, "माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२४ (संसदीय कामकाजाच्या अत्यावश्यकतेच्या अधीन) हिवाळी अधिवेशन २०२४ साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. २६ नोव्हेंबर "संविधान सभेच्या सेंट्रल हॉलमध्ये २०२४ रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा केला जाईल, असं यात म्हटले आहे.