मोठी बातमी! विधानसभेसाठी  मनसेचे  दोन उमदेवार जाहीर
मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर
img
दैनिक भ्रमर
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी २२५ ते २५० जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.  दरम्यान विधानसभेसाठी मनसेकडून २ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. 

मनसेकडून शिवडीतून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर  पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील. बाळा नांदगावर हे पक्षाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ते शिवडी विधानसभेचे माजी आमदारदेखील राहिले आहेत. शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करत बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. 

हे ही वाचा >>> राज ठाकरे यांच्या "त्या" विधानाचा प्रकाश आंबेडकर यांनी घेतला समाचार

 विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. पण कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group