आज 15 जानेवारीरोजी चंद्राचा कर्क राशीत प्रवेश होईल. आज पुष्य नक्षत्रासोबत प्रीति योग जुळून येत आहे. बुध ग्रह सूर्यापासून बाराव्या भावात राहून वाशी योग तयार करेल. आज प्रीति योग रात्री 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहील. तर पुष्य नक्षत्र सकाळी 10 वाजून 28 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर आश्लेषा नक्षत्र जागृत होईल. तसेच आज राहू काळ दुपारी 12 वाजता सुरु होईल ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.
आजचे राशीभविष्य
मेष :-मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. आज वाहने सावकाश चालवावी. डोक्याला जास्त ताण देऊ नका. तणावमध्ये तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात.
वृषभ :- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्यापैकी व्यस्त राहील. आज कामे उरकताना कंटाळा येईल.
मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. आज जवळचा प्रवास योग आहे, मात्र वाहने सावकाश चालवा.
कर्क:- आज तुम्हाला ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यवसायसंबंधी काही नवीन बदल करू पाहाल. तुम्हाला नव्या कल्पना सुचतील.
सिंह:- लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. आज कौशल्याच्या जोरावर तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील.
कन्या:- नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना काही मोठ्या संधी मिळतील.
तूळ:- सर्व महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल. कामाच्या व्यस्ततेमुळे घरातील कामांकडे दुर्लक्ष होईल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.
वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.कोणालाही न विचारता सल्ला देऊ नका. आर्थिक लाभ होईल.
धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.
मकर:- अति धाडस दाखवू नका. कौटुंबिक वादात अडकाल. व्यवसायात केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे.घरात वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना तारतम्य बाळगा. जास्त चिडचिड करू नका.
मीन:- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. विवाहासाठी आज भेटी घेऊ नका, आजचा दिवस फलदायी ठरणार नाही.