मेष
मेष राशीच्या काही लोकांनी आज खोटं बोलणाऱ्यांपासून दूर राहा. एखाद्या गोष्टीचं वाईट वाटण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी लवकरच जागा बदलाचे योग. वाहने जरा जपूनच चालवा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी आज अनोळखी लोकांसोबत कोणताही संपर्क ठेवू नका. आज मिळकतीपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात. वेळेचा सदुपयोग करा. मित्रांसोबत एखादं नवीन काम सुरू करू शकता.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रभावशाली होणार आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेण्याची गरज. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोड बातमी मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहिल. तुम्ही इतरांसाठी एक प्रेरणादायक व्यक्ती बनाल. प्रेम जीवनात चढ उतार येत राहतील. आज आर्थिक बाबतीत सतर्क राहा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. आज नशीबात मोठे बदल आज होऊ शकतात. पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. आजचा दिवस उत्तम राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनी आज संयम ठेवण्याची गरज. जोडीदारासाठी अधिक सजग होऊन त्यांची काळजी घ्या. मालमता किंवा पैशांची देवाणघेवाण करताना खूप सावध राहा.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आज चांगला फायदा होऊ शकतो. दिवस मध्यम फलदायक राहील. दीर्घकाळापासून रेंगाळलेला मालमत्तेचा करार पूर्ण करण्यात तुम्ही सफल व्हाल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना आज मेहनतीचे मोठे यश मिळेल. दुपारनंतर गोड बातमी कानी येईल. घरात आनंदाचं वातावरण राहिल. आज अजिबात दिखाऊपणा करू नका.
धनू
धनू राशीच्या लोकांना आज नोकरीत मनाजोगती प्रगती होण्याचे योग आहेत. तुम्हाला चांगले नेतृत्व आणि अचूक निर्णय घेण्याची गरज.आज मोठा धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला एका मागे एक चांगल्या बातम्या मिळतील. मुलांना अभ्यासात मोठं यश मिळेल. ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहिल.
कुंभ
आज कुंभ राशीच्या लोकांनी आज जरा जपून राहावं. जोडीदाराला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी स्वभावात थोडे गांभीर्य ठेवा.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली राहील. समस्या सोडवताना जोडीदार आणि कुटुंबियांची मदत नक्की घ्या. व्यवसाय वाढवण्यासाठी थोडी अधिक मेहनत करण्याची गरज.