आजचा बुधवार खास!  वाचा  12 राशींचे  आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार खास! वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje
मेष
मेष राशीच्या लोकांचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
 
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील. हाती पैसा आल्याने सर्व टेन्शन मिटेल.

 मिथुन
मिथुन राशीचे लोक आज आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील. गोड बातमी मिळाल्याने दिवस आनंदात जाईल.

 कर्क
कर्क राशीच्या लोकांची आज महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.

 सिंह
सिंह राशीच्या लोकांचे आज महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.
 
कन्या
कन्या राशीचे लोक आज राजकीय क्षेत्रात सहभागी होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. रडखडलेली सर्व कामे मार्गी लागतील.

तुळ
तुळ राशीच्या लोकांचे आज मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. कामात यश मिळेल.
 
वृश्‍चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास करताना वाहने जपून चालावावीत.

 धनु
धनु राशीच्या लोकांचे आज दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मोठं यश मिळेल.
 
 मकर
मकर राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मौल्यवान वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने आनंदी राहाल.
 
मीन
मीन राशीच्या लोकांचा आज उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यवसायात वाढ होईल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group