राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र सुरूच ! मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र सुरूच ! मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
img
Dipali Ghadwaje
देशाच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. अशातच कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारला ईमेलद्वारे सोमवारी दुपारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. कर्नाटक सरकारला दुपारी २.४८ वाजण्याच्या सुमारास ईमेल मिळाला. या ईमेलनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारमधील मुख्यमंत्री सिद्धारमैया, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्र्यांना ईमेलद्वारे बेंगळुरू शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव शाहिद खान असल्याचे समजत आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने २.५ मिलियन्स डॉलरची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे.

या ईमेलमध्ये ट्रेन, मंदिर,हॉटेल आणि अंबारी उत्सवात बॉम्ब ठेवल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे. बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी सायबर क्राइम स्टेशनमध्ये एफआयआर नोंद करण्यात आल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बेंगळुरू सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या धमकीनंतर कर्नाटकात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group