ठाणे : मुंबईनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेला ठाणे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आले आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना इमेल आला आहे. प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात मेलवरद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज असून बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. ठाणे पोलिसांचा शोध कार्य सुरू, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त केला आहे.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात हा धमकीचा मेल आला आहे. मेलमध्ये मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. ठाण्यातील सिनेगॉग चौक हा वर्दळीचा रस्ता आहे. मेल आल्यानंतर संबधित प्रार्थना स्थळाच्या कर्मचाऱ्याने तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. Funing असे धमकी देणाऱ्या ग्रुपचे नाव आहे.