पुणे : पुणे अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीनं दोघांना चिरडलं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यासोबतच धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता, असा खळबळजनक दावा नाना पटोले यांनी केला आहे.
तसेच, या घटनेतील डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना सुरक्षा पुरवावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलताना म्हणाले की, "पबमधून निघाले, त्यामध्ये दोन गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहीली त्या गाडीने दोघांना चिरडलं, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. कोण आमदार? हे मुख्यमंत्री यांनी सांगीतल पाहिजे. मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले, दोन उपमुख्यमंत्री हे जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यांत आहेत." पुढे बोलताना तावरेंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले. तावरे यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारनं याची काळजी घेतली पाहिजे. कोण पोलीस आणि डॉक्टर यांच्यासोबत बोलत होतं, याची चौकशी झाली पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यासोबतच डॉ. तावरे याप्रकरणाचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
"ही घटना हायप्रोफाईल आहे, या घटनेत ज्या पद्धतीनं पुरावे नष्ट केले जात होते, त्यावरुन हायप्रोफाईल असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच, या घटनेशी सहाव्या मजल्याचं कनेक्शन नक्कीच आहे. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, आता जे पोलीस महासंचालक आहेत, त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. कसबा निवडणूकमध्ये तडीपार असलेल्या लोकांना आणुन फिरवलं जातं होतं.
"सहाव्या मजल्याच कनेक्शन आहे, असं बोललं जातं. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, आता जे पोलीस महासंचालक आहेत, त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. पुण्याचं पोलीस आयुक्ताची खुर्ची आहे तीच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. त्यामुळे पुणे प्रकरणात केवळ डॉक्टरांवरच कारवाई करून चालणार नाही, तर उच्चपदस्थ लोकांवरही कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे. कसबा निवडणूकमध्ये तडीपार असलेल्या लोकांना आणुन फिरवलं जातं होतं. पोलिसांनी कारवाई का केली नाही?", असं नाना पटोले म्हणाले.