काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढेलच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा , काँग्रेसला शरद पवार यांनी बॅकफूटवर नेल्याचे चित्र , महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?
काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढेलच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा , काँग्रेसला शरद पवार यांनी बॅकफूटवर नेल्याचे चित्र , महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?
img
Dipali Ghadwaje

विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. सोमवार राज्यभरात बंडखोरांचा वार ठरू शकतो. अशावेळी महायुतीचे, महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप जाहीर झालेले नाही.

दरम्यान काँग्रेसला शरद पवार यांनी बॅकफूटवर नेल्याचे तूर्तास दिसत आहे. जो अधिक जागा लढणार त्याचे उमेदवार अधिक निवडून येणार आणि मग मुख्यमंत्री त्याच पक्षाचा होणार. यानिमित्ताने पवार यांचे भविष्यातील पत्तेही उघड झाले, असे म्हटल्यास नवल नाही.


विदर्भातील 62 पैकी गेल्यावेळी भाजपला 29, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 6, अपक्ष 8, तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी विदर्भात काँग्रेसला चांगली संधी दिसत होती. आज मात्र काँग्रेसची काहीअंशी विविध कारणांनी पीछेहाट होताना दिसत आहे. चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना 90-90-90 आणि मित्र पक्षांना उर्वरित 18 जागा असा आमचा फॉर्म्युला फायनल होईल, असे सांगितले. ते गणित यानिमित्ताने तंतोतंत खरे होताना दिसत आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीत ही खेळी फार पूर्वीच ठरल्याचे उघड आहे.
एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढेलच, असा दावा केला; मात्र या दाव्यातील हवा आता निघताना दिसत आहे.

निर्णायक टप्प्यात आक्रमकपणे पुढे जाणार्‍या पटोले यांना शिवसेनेच्या नाराजी नाट्याचे कारण पुढे करीत दूर करणेही आता लपून राहिलेले नाही.


दरम्यान जुनेच चेहरे द्यायचे, तर तिकीट वाटपाला इतका विलंब का, असा सवाल आता पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. एकंदरीत नव्या चेहर्‍यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. आता यातीलच अनेक जण बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group