नाना पटोले यांच्या अपघातानंतर अतुल लोंढे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
नाना पटोले यांच्या अपघातानंतर अतुल लोंढे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून रात्रीच्या वेळी परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला. नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागील भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातानंतर अतुल लोंढेंनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे. त्यात काय म्हटले आहे वाचा 
विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group