मेष
मेष राशीच्या व्यक्तींना आज कुणाचेही सहकार्य लाभणार नाही. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दिवस संकटाचा असेल.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींना आज संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांची शिक्षणात मोठी प्रगती होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना आज प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीचे व्यक्ती आज जिद्दीने कार्यरत राहतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह
सिंह राशीच्या काही व्यक्तींना आज अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक टेन्शन दूर होणार.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना आज नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. लग्नाळू व्यक्तींसाठी योग जुळून येईल.
तुळ
तुळ राशीच्या काही व्यक्तींना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवहार जपून करा मोठी धनहानी होण्याची शक्यता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे आज महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळेल.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना आज मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दुपारनंतर गोड बातमी मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वाहने जपून चालवावीत. दिवस संकटाचा आहे.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींना आज वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. व्यवसायातील भागीदारीत मोठा लाभ होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होतील.