जगभरात अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं दिसत आहे. अंमली पदार्थ सेवन आणि तस्करी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध देशांकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याचा कोणताही उपयोग होताना दिसत नाहीय. ड्रग्सच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुणाई वावाहत चालली आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू देखील होत आहे.
दरम्यान, पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशातील तरुणाई एका भयंकर ड्रग्सच्या आहारी गेली आहे. झोंबी ड्रग्स असे या ड्रग्सचे नाव असून याची नशा करण्यासाठी येथील नशेच्या आहारी गेलेले तरुण देशातील कबरी खोदून मानवी हाडांपासून हे ड्रग्स तयार करून त्याचे सेवन करत असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून येथील सरकारने थेट आणीबाणी लागू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेतील देश सिएरा लिओनमध्ये मोठं संकट ओढवलं आहे. सिएरा लिओन देशात अनेक लोकांना झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे. या ड्रगसाठी लोक कबरीतील मृतदेह खोदून काढत असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
येथील लोकांना मानवी हाडांपासून बनवलेल्या झॉम्बी ड्रग या सायकोॲक्टिव्ह ड्रग्सचं व्यसन लागलं आहे, त्यामुळे लोक कबर खोदून मृतदेह बाहेर काढून हाडांची चोरी आहेत. या भयंकर धोक्याचा सामना करण्यासाठी सिएरा लिओनचे अध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांना झॉम्बी ड्रगमुळे देशात आणीबाणी लागू केली आहे. लोकांना या ड्रगचं इतकं वाईट व्यसन लागलं आहे की, नशेबाज झॉम्बी ड्रग बनवण्यासाठी कबर खोदत आहेत. सिएरा लिओनमधील लोकांना या झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे. यामुळे अनेक लोकांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी 63 टक्के रुग्णांना या झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे.
काय आहे झॉम्बी ड्रग?
झॉम्बी ड्रग यालाचं कुश असंही म्हटलं जातं. कुश ड्रग हे विविध प्रकारच्या विषारी पदार्थांचे मिश्रण करुन तयार केला जाणारा अंमली पदार्थ आहे. यामध्ये मानवी हाडे हा महत्त्वाचा भाग आहे. मुखत्वे मानवी हाडांचा वापर करुन हा कुश ड्रग म्हणजेच झॉम्बी ड्रग तयार केला जातो.
झॉम्बी ड्रगचं नाव झायलाजीन असं आहे. झॉम्बी ड्रग या औषधाचा वापर हा जनावरांसाठी केला जातो. जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, ब्लॅक मार्केटमधून याची विक्री अमली पदार्थाच्या रुपात केली जाते. झॉम्बी ड्रग स्वस्त असल्याने नशेबाज याचं सेवन करतात.