शिंदे गावात ड्रग्स निर्मितीचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधी रुपयांचा माल पोलिसांच्या ताब्यात
शिंदे गावात ड्रग्स निर्मितीचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधी रुपयांचा माल पोलिसांच्या ताब्यात
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):-राज्यात एमडीची तस्करी करणाऱ्या बहुचर्चीत ललित पाटीलचा शिंदे गाव एम आय डी सी त असलेला एम डी चा कारखाना साकीनाका पोलिसांनी उध्वस्त करीत कोट्यावधी रुपयांचा साठा जप्त केला असून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ललित पाटीलचे जाळे राज्यभर पसरले आहे की काय असा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.
       
पूणे कारागृहातुन वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल होत तेथून एम डी या अमली पदर्थ विक्री करणारा उपनगर येथील एका राजकीय पक्षात काम करणारा ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. यात अनेक पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र ललित पाटील एम डी हे अमली पदर्थ नाशिकरोड जवळील शिंदे गावात तयार करत असल्याने व याबाबत स्थानिक पोलिसांना याची माहिती नसल्याने मुबंई पोलिसांचे तारे जमीपर आले.

साकीनाका पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी अमली पदर्थ तस्करी चा गुन्हा दाखल केला होता. त्या त्यांनी एक आरोपी अटक केला. त्याच्या माहिती वरुन साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांची मदत घेत शिंदे गाव एम आय डी सी त असलेला एम डी चा कारखानावर बुधवारी रात्री छापा घेतला. हा कारखाना ललित पाटील लहान भाऊ भूषण पाटील चालवत होता.

तो त्या ठिकाणी कच्चा माल आणून एम डी बनवत होता. सदर ची जागा ही यादव नामक व्यक्तीच्या मालकीची असून ललित पाटील याने ती भाड्याने घेतली होती. तिथे भूषण पाटील हा माल तयार करायचा आणि त्यास जिशान इकबाल शेख वय 26 हा कामगार म्हणून काम करायचा. त्यास साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थाळा वरून एक किलो आठशे ग्राम एम डी व तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा कोट्यावधी चा माल हस्तगत केला आहे.

ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्या नंतर भूषण पाटील ने कारखाना मधील तयार माल व सामुग्री लपास केली असावी अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली.साकीनाका पोलीस तब्बल तीन दिवस नाशिकरोड परिसरात तळ ठोकून होते. पाटील बंधू चे सर्व बैठकीतले मित्र परिवार पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते. हा कारखाना चालू होता मात्र याची स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group