वडिलांची 'ती' एक गोष्ट खटकली अन पोलीस असलेल्या लेकीनेच लाडक्या वडिलांची हत्या केली
वडिलांची 'ती' एक गोष्ट खटकली अन पोलीस असलेल्या लेकीनेच लाडक्या वडिलांची हत्या केली
img
वैष्णवी सांगळे
चंद्रपूर जिल्ह्यातील एका धक्कादायक खुनाचा थरार तब्बल ३ वर्षांनंतर उघड झाला असून या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याची हत्या त्याच्याच पोलीस असलेल्या मुलीने केली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या हातांनीच कायद्याची पायमल्ली केल्याने जिल्हयात खळबळ उडालीय. 



हत्या का केली ?
स्वतःच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे आर्या बाल्लावार हिने वडील जयंत बाल्लावार यांना विष देऊन मारलं होतं. मिल्कशेकमध्ये विष मिसळून जयंत यांना देण्यात आलं होतं. जयंत बाल्लावार हे देखील पोलीस विभागात कार्यरत होते आणि त्यांचा मृत्यू ड्युटीवर असतानाच झाला होता. मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीमुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. आर्याने विष मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून 5 हजार रुपयांना विकत घेतलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. 

३ वर्षानंतर खुलासा कसा झाला ?
वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिष यांनी लग्न केलं, परंतु नियतीने या गुन्ह्याचा हिशोब पूर्ण केला. लग्नानंतर आर्या आणि आशिष यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. आशिषला त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे पोलीस ट्रेनिंगमधून बडतर्फ करण्यात आले होते, तर आर्या सासरी न राहता माहेरीच राहत होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडायचे.

नवरा बायकोच्या या वादातून संतापलेल्या आशिषने अखेर पोलीस ठाणे गाठलं आणि आपल्या पत्नीनेच वडिलांचा खून केल्याचा गौप्यस्फोट केला. ज्या मुलीने जोडीदारासाठी वडिलांचा जीव घेतला, त्याच जोडीदाराने हा गुन्हा उघड केला.रामनगर पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी आर्या बाल्लावार, आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष पुरवणाऱ्या एका साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून यातून अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group