अशोक खरातला ३९ आमदार भेटले; मात्र मलाच लक्ष्य केले जात आहे , दीपक केसरकरांचे वक्तव्य
अशोक खरातला ३९ आमदार भेटले; मात्र मलाच लक्ष्य केले जात आहे , दीपक केसरकरांचे वक्तव्य
img
वैष्णवी सांगळे
महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरात २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहे. दरम्यान त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे होत आहे. दरम्यान या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून टाकली आहे कारण खरातचे राजकीय भक्त देखील होते. 



श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने माजीमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना केसरकर म्हणाले, भोंदू खरातच्या दुष्कृत्याबाबत माहित नव्हते, मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो. खरातने मंदिराच्या आडून केलेल कृत्य निंदनीय आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना त्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्यांनाही या भोंदूची कल्पना नव्हती.

मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. शिर्डीला येण्याच्या वाटेवर ईशान्येश्वर मंदिर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग मी ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. त्या निमित्ताने खरातशी ओळख झाली. त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग नाही. त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्याच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे, त्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे.

खरातने ज्योतिष शास्त्र बदनाम केले आहे, असेही स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले. तर जवळजवळ ३९ आमदार खरातला भेटून गेले, मग मलाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group