मराठा बांधवांनी केलेल्या आवाहनामुळे नाशिकरोड मधील दुकाने दुपारी बंद
मराठा बांधवांनी केलेल्या आवाहनामुळे नाशिकरोड मधील दुकाने दुपारी बंद
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी) सकल मराठा समाजाच्या वतीने आज दुपारच्या सुमारास नाशिकरोड मधील विविध भागात फिरून बंद चे आवाहन केले. अचानक मराठा समाजाचे बांधवांनी बंद चा आग्रह केल्याने बाजारपेठेत धावपळ निर्माण झाली.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणा च्या आंदोलनावर जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे बांधवांवर अमानुष लाठीहल्ला करून अनेकाना जखमी केले.

याचे पडसाद महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका स्तरावर पडले. विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी जालना येथे जाऊन आंदोलकांची व जखमींची विचारपूस केली. सकल मराठा समाजाच्या वतीने या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी तीन मार्च रोजी महाराष्ट्र बंदची भाग देण्यात आली होती. सकाळी नाशिक शहरात भव्य मोर्चा  काढून बंद पाळण्यात आला.

मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकरोड मधील सकल मराठा समाजाचे बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज येथील पुतळा जवळ एकत्र येऊन मीना बाजार,फळ मार्केट, उड्डाणपूल भाजी मार्केट,मुक्तीधाम रोड, शाहूपथ, राजेंद्र कॉलनी, जामा मस्जिद, जुना बिटको हॉस्पिटल रोड,देवी चौक जवाहर मार्केट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड या भागात फिरून दुकानदारांना व  हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने बंद आवाहन केले. अचानक मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरल्याने दुकानदार व हातगाडी चालकांची एकच धावपळ उडाली. जमावाच्या भीतीपोटी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करणे पसंत केले. काही काळ वर्दळ निर्माण झालेल्या रस्त्यावर अचानक शुकशुकाट दिसून आला.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिकांनी खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठा पोलीस फाटा तैनात केला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group