नाशिकरोड (प्रतिनिधी):-देश व राज्यात एम डी प्रकाराना मुळे नाशिकरोडचे नाव गाजत आहे. यात प्रमुख भूमिका असलेल्या ललित पाटील व इतर तिघांचा मुक्काम सद्या नाशिकरोड पोलिसांच्या कोठडीत असून त्याना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
साकीनाका पोलिसांनी शिंदेगाव येथे दोन महिन्या पूर्वी एम डी या मादक पदर्थचा कारखाना उध्वस्त केला. त्याच वेळी या कारखान्याची निर्मिती करणारा ललित पाटील याने येरवडा कारगृह ते ससून हॉस्पिटल प्रवास करुन पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने पळून गेला. हा विषय राज्यभर चर्चीला गेला. आणि नाशिककराना धक्का बसला. या मुळे पोलीस दलात ही खळबळ उडाली आणि काही अधिकारी यांच्या बदल्या झाल्या. शिंदे एम आय डी सी येथे कंपनी तपास करीत असताना शिंदे गाव येथील जाधव नामक व्यक्तीने त्याच्या मालकीच्या गोडावून मध्ये काही तरी अपरित घडत असल्याचे नाशिकरोड पोलिसांना कळवले.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देविदास वांजळे व गुन्हे शोध पथकाचे साह्ययक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी बंद गोडावून फोडून त्यातुन काही कोटी चे एम डी पावडर व ते तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या कच्चा माल जप्त केला. तो पर्यंत पुणे पोलिसांनी ललित पाटील च्या मुसक्या आवळाल्या होत्या. चौकशी मध्ये दुसरा कारखाना ललित पाटील त्याचा बंधू भूषण आणि इतराचा असल्यचे निष्पण झाले आणि नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आणि तपास नाशिक येथील अमली पदार्थ विरोधी पथकाला दिला गेला.
या प्रकारणाचा तपास करण्यासाठी या पूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाने भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना ताब्यात घेतले.तसेच अर्थवरोड कारागृहात असलेल्या ललित पाटील, सह हरीशचंद्र चौधरी, जिशान शेख व रोहित कुमार चौधरी यांना तपासा साठी न्यायालयाची परवानगी घेऊन शुक्रवारी ताब्यात घेऊन रात्री उशिरा बिटको रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयात हजर करण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले आहे.
सद्या तरी ललित पाटील व इतर त्याला मदत करणाऱ्या सहकार्याचा मुक्काम नाशिकरोड मध्ये असून घटनास्थळी त्याना नेण्याची शक्यता आहे.ललित पाटील सह इतर संशयित नाशिकरोड पोलीस ठाण्यात असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके बारीक लक्ष देऊन आहेत.