नाशिकरोड (प्रतिनिधी):- दोन भावांच्या कौटुंबिक वादातून एका भावाने मद्यधुंद होऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक छऱ्यांची असून तो त्यात किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या चा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव अमोल पंडीत कुमावत (वय 40, रा. कौशल्य हॉटेल मागे, नांदूर नाका, जत्रा हॉटेल रोड, औरंगाबाद रोड, नाशिक) आहे. पोलिसांनी सांगितले की अमोल आणि त्याचा भाऊ यांचा कौटुंबिक वाद आहे. औरंगाबाद रोड,नांदूर नाका येथील अमोल कुमावत हा नाशिकरोड जगताप मळा येथील आपल्या भावाकडे दारू पिऊन आला.
दोघा भावामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. याचा मनात राग धरून अमोलने आपल्या जवळ असलेल्या छऱ्यांच्या पिस्तुल मधून आपल्या कानशिलावर गोळी झाडून घेतली.
भाऊ आणि घरचे मंडळी घाबरून त्याला धरू लागले. मात्र अमोल ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहून त्याचा मेव्हणे अतिष बेलदार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.अमोल च्या डोक्याला छरै हे चाटून गेल्याचे समजते. अमोल कुमावत हा नांदूर नाका येथील राहत असल्याने आडगाव पोलीस ठाण्यात रुग्णालयाने खबर कळवली असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहादे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उपचार घेऊन तो घरी गेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले