नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : सरकारच्या जी एस टी विभागाच्या छाप्यात नाशिकरोड येथील एका युवक उद्योजकाकडे गावठी कट्टा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. जीएसटी विभागाने कोणत्या कारणाने छापा टाकला हे अद्याप समजू शकले नाही.
श्रीकांत प्रसाद पर्हे, वय 27 राहणार व्यवसाय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. फ्लॅट नंबर 104 कपालेश्वर बिल्डिंग सुराणा हॉस्पिटल चौक नाशिक रोड या युवक उद्योजकाकडे आज पहाटे पुणे येथील डायरेक्ट रेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स. पुणे झोनल युनिट जॉईंट डायरेक्टर अधिकारी अभय फाळके, सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर वेणु रेड्डी यांच्या पथकाने आज सकाळी पहाटे त्यांच्या घरावर छापा टाकला.
छाप्यामध्ये कागदपत्राची पडताळणी करीत असताना त्यांच्या कपाटात बेकायदेशीर असलेला गावठी कट्टा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती मिळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र जीएसटी विभागाच्या कारवाईनंतर संबंधित उद्योजकाला गावठी कट्ट्या प्रकरणी ताब्यात घेतले जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या छापा बाबत पोलीस सह सर्वच यंत्रणा अनभिन्न होते.युवा उद्योजकाने हा गावठी कट्टा कोठून व कोणासाठी, कधी आणला? असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.