नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल  होताच अतिक्रमणधारकांनी हटविल्या टपऱ्या
नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल होताच अतिक्रमणधारकांनी हटविल्या टपऱ्या
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- येथील तीन ठिकाणी मनपाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. 

नाशिकरोड शहरातील अतिक्रमणसाठी मनपा प्रशासनाने पहाटे पासून तयारी केली. त्यासाठी मनपाच्या सहा विभागांच्या सहा गाड्या व 35 कर्मचारी, एक जेसीबी, दोन ट्रॅॅक्टर व पोलीस बंदोबस्तातील अधिकारी, कर्मचारी असा लवाजमा सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकरोडला पोहोचला. नाशिकरोडमध्ये मोठी कारवाई होईल, असे वाटले.

मात्र पथकाने मस्जिद रोडवरील दिव्या शोरूम समोर व देवी मंदिर गार्डन लगत असलेल्या आठ टपऱ्या काढत असतांना टपरीधारकांनी स्वतः टपरी काढून घेतल्या. त्यानंतर सुभाष रोड येथील नैसर्गिक नाल्यावरील दोन टपऱ्या काढण्याची सुरुवात करताच मालकांनी त्या काढल्या. मनपाने फक्त तेथील ओटे फोडले. मुक्तीधाम येथील होकर्स झोनमधील एका टपरी धारकाने वाढीव टपरी ठेवल्याने ती मंजूर आहे.

तेवढी टपरी ठेवली व वडनेर गावातील हनुमान मंदिरा जवळील मनपाच्या जागेत होत असलेले बांधकाम पाडून ते ताब्यात घेण्याचे काम सुरु होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group