ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 3 नवे उमेदवारांना मिळाली संधी
ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 3 नवे उमेदवारांना मिळाली संधी
img
DB

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहे. दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीनंतर आता ठाकरे गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी तीन उमेदवार जाहीर झाले आहे.

यांना मिळाली संधी : 

वर्सोवा - हरुन खान

घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव

विलेपार्ले - संदिप नाईक


उद्धव ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून ही यादी ट्वीट करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापूर्वीच दुसरी यादी जाहीर केली होती.  ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवार होते. त्यानंतर आज दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी ३ उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group