'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी'... अजित पवार यांचं  मोठं वक्तव्य
'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी'... अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी एक मोठे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच यावेळी सामना रंगला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया पवार या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार होत्या. तर त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. आता या लढतीबाबत अजितदादांच्या एका वक्तव्याने मोठे वादळ उठले आहे.

 विधानसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर अजित  पवार  'जन सन्मान यात्रे'वर निघाले आहेत. त्या दम्यान, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बहिण 'सुप्रिया सुळे विरोधात पत्नि सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक झाली, राजकारण घरात येऊ देऊ नये', असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  'माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे. घरात राजकारण येऊ देऊ नये. माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना निवडणूकाच्या मैदानात उतरवण्याची चूक मी केली आहे. असे व्हायला नको होते. पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला. मला वाटते. ते चुकीचे होते,' असे अजित पवार म्हणाले.

म्यान, काही दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपला आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का असे विचारले आसता. 'सध्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दिवशी जर सगळे एकाच ठिकाणी असतील तर तो त्यांना नक्कीच भेटेल', असे ते म्हणाले. 'जन सन्मान यात्रेत केवळ शेतकरी, महिला आणि तरुणांसाठीच्या विकास आणि कल्याणकारी योजनांवर बोलण्याचा निर्णय घेतला आहे', माझ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही. असे अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group