आमदार जयंत पाटलाचा भाजपच्या एका आमदारावर गंभीर आरोप; ते आमदार कोण?
आमदार जयंत पाटलाचा भाजपच्या एका आमदारावर गंभीर आरोप; ते आमदार कोण?
img
Jayshri Rajesh
कोविड महामारीच्या काळात एका रुग्णालयानं मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून सरकारकडून मिळणारे पैसे लाटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी इथं श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावानं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. 

कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

या रुग्णालयानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवले आहेत. यातील डॉक्टर नमूद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते व त्यांनी कोणत्याही रुग्णांवर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. या हॉस्पिटलची चौकशी झाली तेव्हा डॉ. शश‍िकांत कुंभार यांनी चौकशी सम‍ितीला असं ल‍िहून द‍िलं की, मी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही. कुंभार हे एकटे नसून असे एकूण ४६ डॉक्टर आहेत.

रुग्णालयाच्या संचालक मंडळानं स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टरांची नावं दाखवली आहेत. इतकंच नव्हे, संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव न घेता, खोटी कागदपत्रे दाखवून, बोगस डॉक्टर दाखवून ३०० बेडचे रुग्णालय नुतनीकरणाचा प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेकडं सादर करून व हे नुतनीकरण प्रमाणपत्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी करार करताना जोडून शासनाची व संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, असंही पाटील यांनी निदर्शनास आणलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group