राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज?  विधानसभेच्या जागांवरून महायुतीत जुंपण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज? विधानसभेच्या जागांवरून महायुतीत जुंपण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
मुंबई : आगामी विधानसभा निडवणूक जाहीर होण्याची आधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच जागावाटपावरून भाजप - राष्ट्रवादीत राडा होण्याची शक्यता दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत किती जागा मिळाल्या पाहिजे, याचा आकडा छगन भुजबळांनी सांगितला. छगन भुजबळ यांनी ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार यांच्यामुळे राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी हुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहे. दरम्यान, आता यासंदर्भात अजित पवार यांनाही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना, छगन भुजबळ हे नाराज नसून माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group