मोठी बातमी : विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे जबरदस्त प्लँनिंग ; पुणे अन् दिल्ली दौऱ्याच्या तारखा आल्या समोर
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे जबरदस्त प्लँनिंग ; पुणे अन् दिल्ली दौऱ्याच्या तारखा आल्या समोर
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी या पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणून ते 3 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तसेच चार ऑगस्टला ते दिल्ली दौरा देखील करणार आहेत. 

लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील सक्रिय झाले आहेत. ते पुढच्या महिन्यात तीन आणि चार तारखेला अनुक्रमे पुणे आणि दिल्लीचा दौरा करणार आहेत. 

चार ऑगस्टला दिल्लीचा दौरा 
पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ते आगामी काळात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहेत. त्यासाठी ठाकरे यांनी दौरे चालू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे 3 ऑगस्ट रोजी पुण्याचा आणि त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी दिल्लीचा दौरा करणार आहेत. 

ठाकरे गटाकडून 3 ऑगस्ट रोजी पुण्यात पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाल ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व
हा दौरा झाल्यानंतर लगेच 4 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ठाकरे कोणाची भेट घेणार, या दिल्ली दौऱ्याचा नेमका विषय काय? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या दौऱ्यांना विशेष महत्त्व आले आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group