"२९ ऑगस्टला बघा मी कसा डाव टाकतो...." ; मनोज जरांगेंचे सरकारला चॅलेंज
img
Dipali Ghadwaje
आजपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाचव्यांदा उपोषणाला बसले. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहेत्याचसोबत  त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची रणनीती ठरली आहे.  दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची रणनीती सांगितली.

'२० ते २७ ऑगस्टमध्ये राज्यातील सर्व मतदरसंघातील इच्छुकांनी आंतरवाली सराटीमध्ये यावेत. छोटे मोठे पक्ष आणि समाजातील लोकांनी यावेत. सर्वांची मोट बांधायची आहे. जर आपल्याला सर्व जाती धर्माचे समीकरण जुळले तर निवडणूक कशी लढवायची ते कळेल. जर सर्व समीकरण जुळले तर निवडणूक लढवता येईल. सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन एकमेकांना निवडून आणायचे. बारा बलुतेदार एकत्र यायचे. असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'जर आपले ठरले तर मराठ्यांनी एकही मत वाया जाऊ द्यायचे नाही. आपण जर निवडणूक लढवली तर युतीवाले खुश होतात आणि निवडणूक लढवली नाही तर महाविकस आघाडीवाले खुश होतात. त्यांची स्टाईल बघा आघाडीवाले म्हणतात ओबीसीबाबत बोलू नका. अशी शाळा सुरू आहे त्यांची. दोन्ही आपल्याला येड्यात काढत आहेत. त्यासाठी आपण आपले परफेक्ट करायचे.

समजा जर आपले समीकरण जमले नाहीत तर त्यासाठी २९ ऑगस्टला राज्याची बैठक ठेवून कुणाला पाडायचे असे जाहीर करू. त्या दिवशी या आंदोलनंला एक वर्ष पूर्ण होत आहे.

तसंच, 'आपले समीकरण जमले नाही तर जो उमेदवार आपली ओबीसी आरक्षणाची मागणी करेल त्याला मतदान करायचे. मग ते कोणीही असू द्या. दुसऱ्याला पाडायचे. शेवटी पॉवर सर्व समाजाच्या हातात राहिली पाहिजे. बघा मी २९ ऑगस्टला कसा डाव टाकतो.', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारलाच चॅलेंज केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group