नाशिक विधानपरिषदेसह
नाशिक विधानपरिषदेसह "या" चार मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदार संघातील दोन असा चार आमदारांचा कार्यकाल 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी निवडणुका जाहीर केल्या असून, तातडीने आचारसंहिता लागू केली आहे. 

विधान परिषदेतील मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार मतदार संघातील निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 

या निवडणुकीची आचारसंहिता ताबडतोब अंमलात येणार असून, निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 15 मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. उ

मेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 22 मेपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 24 मे रोजी होईल तर दि. 27 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. निवडणुकीचे मतदान 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल आणि मतमोजणी 13 जून रोजी होईल. तसेच 18 जून रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

निवडणुकीची मार्गदर्शक तत्वे- https://www.eci.gov.in/ eci-backend/public/api/download या वेबसाईटवर मिळू शकेल, अशी माहिती निवडणूक आयोगाचे अन्डर सेक्रेटरी प्रफुल्ल अवस्थी यांनी दिली आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group