डोक्याला पिस्तुल लावून 60 लाखांच्या खंडणीची मागणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
डोक्याला पिस्तुल लावून 60 लाखांच्या खंडणीची मागणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- कंपनीच्या भागीदारीतून आर्थिक व्यवहारांतील वाद झाल्याने संशयित दोघांनी एका कंपनी मालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून साठ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

कंपनी विकून पैसे दे, नाहीतर कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कंपनी चालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने नाशिकरोड पोलीसात दोघा संशयितां विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नवनाथ आहेर, सुनील खोकले अशी खंडणी मागणाऱ्या
दोघा संशयितांची नावे आहेत. तक्रारदार नंदू रामदास मोरे (३६, रा.
चिंचोडी बु., ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, शिंदे – नायगाव
रोडवर कंपनी असून यात मोरे यांची संपत सोनवणे यांच्याशी भागीदार आहे.

९ जुलै २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजता ते कंपनीत असताना संशयित आहेर, खोकले आले. त्यांनी, मोरे व त्यांचे भागीदार संपत सोनवणे यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराच्या देण्याघेण्यातून मोरे
यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ६० लाखांच्या खंडणी मागणी केली
तसेच, पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन
अशी धमकीही दिली. तुझी कंपनी बंद कर, बंद केली नाहीतर पैसे
कसे काढायचे मला माहिती आहे.

माझा मित्र विजय व सर्जेराव सोनवणे हे जरी तुझ्या व्यवसायात
भागीदार असेल तरी तुला पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुझी कंपनी
विकून पैसे दे, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने नाशिकरोड पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे हे तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group