नाशिक हादरले!  सिडकोत पुन्हा खून
नाशिक हादरले! सिडकोत पुन्हा खून
img
DB
नाशिक (प्रतिनिधी) :- सिडको परिसरातील शिवाजी चौकात एका युवकाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
आठवडाभरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खून आहे. सततच्या खुनांच्या घटनांनी व वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहर हादरून गेले आहे.

या हल्ल्याबाबत समजलेली माहिती अशी, की सिडको परिसरातील शिवाजी चौकात एक युवक उभा असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने या युवकाचा यात मृत्यू झाला.


जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलीस मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून, मयत इसम हा भाजी विक्रेता असल्याचे समजते. मयत झालेल्या युवकाचे नाव संदीप असल्याचे समजते . 



इतर बातम्या
Join Whatsapp Group