प्रसिद्ध युट्युबर रणवीर अल्लाहबादियाचं यूट्यूब चॅनल हॅक
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अल्लाहबादियाचं यूट्यूब चॅनल हॅक
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अल्लाबदियाचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. तसेच त्याचे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत. हॅकर्सनी नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड विजेत्या यूट्यूबरचं लोकप्रिय चॅनल BeerBiceps हॅक केलं आणि त्याचं नाव आता "@Elon.trump.tesla_live2024" असं बदललं आहे. यासोबतच त्याच्या पर्सनल चॅनेलचं नाव देखील बदलून "@Tesla.event.trump_2024" असं करण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, हॅकर्सनी युट्युबरच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ डिलीट केले आहेत. तसेच हॅकर्सने AI जेनरेटेड डीपफेक व्हिडिओच्या मदतीने एलन मस्क सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसह थेट लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. लाईव्ह स्ट्रीममध्ये, हॅकरने लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि त्यांचे पैसे दुप्पट केले जातील असे वचन दिलं आहे.
 

चॅनल हॅक झाल्यानंतर रणवीरची प्रतिक्रिया 

आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?" अशी स्टोरी शेअर केली आहे. रणवीरला पंतप्रधान मोदींनी पुरस्कार दिला होता. सध्या यूट्यूबवरून दोन्ही चॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. हे दोन्ही चॅनेल सर्च केले असता, ते कंपनीच्या धोरणाच्या विरोधात असल्याचं यूट्यूबने सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group