धक्कादायक !  भावानेच केली भावाची निर्घृण हत्या
धक्कादायक ! भावानेच केली भावाची निर्घृण हत्या
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे घडत आहेत.  कल्याणमधून अशीच  एक धकाकदायक घटना समोर आली आहे. एक  भाऊच आपल्या भावाचा वैरी बनला आहे. जमिनीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केलीय असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्याच चुलत भावाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. आरोपीने पहिले त्याच्या भावाला गोळी मारली यानंतर त्याच्या डोक्यावर चाकूने सपासप 8 वार केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास रामसागर दुबे याने आपला चुलत भाऊ रणजीत दुबे याच्यावर हल्ला केला. रामसागरने पहिले रणजीतला गोळी मारली, यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये रणजीत दुबे याचा जागीच मृत्यू झाला.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हत्येचं कारण उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील जमीन ठरली. दोन्ही चुलत भावांचं गुन्हेगारी रेकॉर्डही आहे. तसंच दोघंही याआधी उत्तर प्रदेशमध्ये जेलमध्येही जाऊन आले आहेत. मृत्यू झालेल्या रणजीत दुबे याच्यावर आणखी एका प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल होता.

रणजीत दुबेची हत्या केल्यानंतर पोलिसांनी लगेचच रामसागर दुबे याला अटक केली. रामसागर याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान याप्रकरणी रणजीत याच्या कुटुंबाने पोलिसांवर आरोप केला आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे आरोपींचं मनोबल वाढलं आणि त्यांनी गोळीबार केला याआधीही जमिनीवरून वाद झाला होता, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group