चारही मुलीच झाल्याने विवाहितेचा छळ
चारही मुलीच झाल्याने विवाहितेचा छळ
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- चारही मुलीच झाल्याने, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी सातपूर येथील सासरी होती. त्यावेळी पती सूरज निवृत्ती रामराजे, सासू मालती बळीराम राजे, दीर नीलेश निवृत्ती रामराजे व मावससासू सुलभा बबन सोनवणे (सर्व रा. प्रबुद्धनगर, सातपूर, नाशिक) यांनी संगनमत करून विवाहितेला चार मुली झाल्या म्हणून वाद घातला, तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली व शारीरिक व मानसिक छळ केला.

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group