मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला नव्हता. वाल्मिक कराड याच्यावर देखील मोक्का लावण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून सुरू होती. अखेर आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
दरम्यान वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर परळीमधील त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आला, त्यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याचे समर्थक त्याच्या समर्थनासाठी रस्त्य्यावर उतरले होते. पाण्याच्या टाकीवर चाढून आंदोलन सुरू होतं. याचदरम्यान एकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली, वाल्मिक कराडची आई देखील या आंदोलनात सहभागी झाली होती. मात्र आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे.
दम्यान वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची बातमी समोर येताच त्याचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. तसेच यावेळी आंदोलकांकडून बसवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे आता परळीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.