अरे व्वा ! नाशिकच्या हर्षवर्धन जोशीचा लेह-लडाखमध्ये डंका
अरे व्वा ! नाशिकच्या हर्षवर्धन जोशीचा लेह-लडाखमध्ये डंका
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : लेह-लडाखमधील इंडोअर स्टेडियम, N.D.S ग्राउंड येथे 2 ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित 9वी पिंच्याक सिल्याट फेडरेशन कप स्पर्धेत नाशिकच्या खेळाडू हर्षवर्धन जोशीने सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव उजळवले आहे. 45 ते 50 वयोगटातील टेंडिंग (फाईट) या खेळ प्रकारात त्यांनी हा विजयी पराक्रम केला आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनिअर आणि सिनियर या दोन्ही वयोगटांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यातील हर्षवर्धन जोशी यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. हर्षवर्धन जोशी यांच्या या यशामागे इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले आणि नाशिक जिल्ह्याचे सचिव नागेश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि योग्य दिशादर्शनामुळे हा खेळाडू या उच्चांकावर पोहोचू शकला आहे.

सावधान ! ३0 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने अन... मोठी फसवणूक

पिंच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार आहे जो पाच वेगळ्या स्पर्धा पद्धतीमध्ये खेळला जातो: (1) टेंडिंग (फाईट), (2) तुंगल (सिंगल काता), (3) रेगु (ग्रुप काता), (4) गांडा (डेमी फाईट), आणि (5) सोलो (इव्हेंट).  या खेळाला भारतात अधिकृत मान्यता मिळाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकारने या खेळाचा समावेश आपल्या 5% राखीव नोकरभरतीमध्ये केला आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विद्यापीठ संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशिया यांनी या खेळाला मान्यता दिली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख
पिंच्याक सिल्याट हा खेळ आता एशियन गेम्स, एशियन मार्शल आर्ट गेम्स, युथ गेम्स आणि एशियन बीच गेम्स यासारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. गोव्यात आयोजित 37व्या राष्ट्रमंडळ स्पर्धेमध्ये 14 मे 2023 रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने या खेळाचा समावेश केला आहे. खेलो इंडिया वूमन लीगमध्येही या खेळाला स्थान मिळाले आहे.

 महाराष्ट्राचे वर्चस्व
या खेळामध्ये गेली 11 वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी राहिला आहे, ज्यामुळे राज्याच्या या खेळातील दर्जेदार कामगिरीचा पुरावा मिळतो. या खेळामार्फत महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरभरतीतून रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group