नाशिक : गंगापूर रोडला वाईन शॉप फोडून सव्वाचार लाखांच्या दारूच्या बाटल्या लंपास
नाशिक : गंगापूर रोडला वाईन शॉप फोडून सव्वाचार लाखांच्या दारूच्या बाटल्या लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : दुकानाच्या शटरच्या कुलूप लावण्याच्या ठिकाणची पट्टी कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानातील सव्वाचार लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.फिर्यादी संदीप भास्कर कोकाटे (रा. मखमलाबाद रोड, इम्पिरिअल अपार्टमेंट) यांचे शहीद सर्कलजवळ गंगापूर वाईन शॉप नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. 

भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू

यावेळी दुकानात 27 हजार रुपये किमतीची जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल, 24 हजार रुपये किमतीची रॉयल सॅल्यूट, 14 हजार 500 रुपये किमतीची रामपूर असावा, 25 हजार रुपये किमतीची रामपूर, 31 हजार 500 रुपये किमतीची ग्लेन फिरिच, 10 हजार 400 रुपये किमतीची डिव्हाज, 46 हजार 500 रुपये किमतीची ग्लेन लेबिट, 20 हजार रुपये किमतीची मॅकेलन, 2 हजार 75 रुपये किमतीची हिबिकी, 16 हजार 500 रुपये किमतीची डालमोअर, 21 हजार 200 रुपये किमतीची चिवास अल्टीज्, 11 हजार 250 रुपये किमतीची जॉनी वॉकर, 14 हजार 250 रुपये किमतीची लगाव लीन, 28 हजार 500 रुपये किमतीची जिवास, 51 हजार रुपये किमतीची ग्रेन लिबिट, 2 हजार 400 रेड लेबल, 4 हजार 200 रुपये किमतीची ब्लॅक लेबल अशा प्रत्येकी एक व दोन दारूच्या बाटल्या व 45 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 4 लाख 33 हजार 275 रुपये किमतीच्या महागड्या दारूच्या बाटल्या दुकान फोडून चोरून नेल्या. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार कहांडळ करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group