कळवण प्रतिनिधी : कळवण शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहरात विविध विकासकामे सुरू असून जनतेने जो विश्वास टाकला तो खरा ठरवुन कळवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबध्द असलेल्यांचे प्रातिपादन कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी केले.
कळवण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील आ.श्रीकांत जी भारतीय यांच्या अथक प्रयत्नांतून व निधीतून ५० लक्ष रुपयांचा बुद्ध विहार विकासकांच्या भूमीपूजनाचा प्रसंगी पगार बोलत होते.कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी डॉ.दौलतराव आहेर पतसंस्थेचे संस्थापक नंदकुमार खैरनार हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष तेजस पगार,सामाजिक कार्यकर्ते राहुल केदारे, नगरसेवक अतुल पगार, बाळासाहेब जाधव ,राहुल पगार जयेश पगार, सुनील महाले , स्वीकृत नगरसेवक अजय मालपुरे सामाजिक कार्यकर्ते खंडू निकम,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार ,राजेश पगार ,कमको बँकेचे माजी चेअरमन नितीन वानखेडे, नंदकुमार वालखेडे, अशोक वालखेडे, व्यापारी महासंघाचे सरचिटणीस जयवंत देवघरे,मनोज देवरे, प्रदिप निकम, आदी उपास्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी तेथील रहिवाश्यांनी बौद्ध विहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती द्यावी ही मागणी केली असता मान्यवरांनी मान्य केले.
यावेळी बाळासाहेब बस्ते, संजय बस्ते, विजय बस्ते, नरेंद्र गरूड, सुनिल बस्ते, सुरज बस्ते, प्रथमेश बस्ते,गौरव बस्ते,केशव लोखंडे,सचिन बस्ते, विलास बस्ते,रामू बस्ते,कुणाल बस्ते, किशोर पवार ,रमेश बस्ते,पप्पु बस्ते, चंद्र बस्ते, बापु अहिरे, कैलास पवार, विष्णु बस्ते,दिलिप बस्ते, कुन्दन बस्ते,अमोल बस्ते,रोहित बस्ते, मुकेश बस्ते,तुषार बस्ते,विक्की बस्ते,अरुण बस्ते,आण्णा बस्ते ,परशुराम बस्ते,पिंन्दु बस्ते,बंन्टी बस्ते,कैलास बस्ते,ताना पवार,बाल जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल केदारे यांनी तर सूत्रसंचालन व आभार बापु पवार यांनी केले.
आमदार श्रीकांत भारतीय (विधान परिषद सदस्य) यांच्या वैयक्तिक पाठपुराव्यातून कळवण नगर पंचायत वॉर्ड क्रमांक १५ मधील सरस्वती कॉलनी ते पोपट झीप्रू पगार यांचे घरापर्यंत भूमिगत गटार व काँक्रीटीकरण , ₹४०. लक्ष व कळवण नगर पंचायत वॉर्ड क्रमांक ९ मधे बुद्ध विहार बांधणे ₹५०. लक्ष मधील वरील कामांसाठी आ. श्री भारतीय यांनी सततच्या पाठ पुराव्याने नगर विकास विभागाने ₹९०.लक्ष ची मान्यता मिळून निधी मंजूर झाला आहे.
नंदकुमार खैरनार
महामंत्री (भाजपा)