NEET परीक्षा प्रकरणातील पुण्याचा संशयित अखेर सापडला, पेपर कसा फुटला?
NEET परीक्षा प्रकरणातील पुण्याचा संशयित अखेर सापडला, पेपर कसा फुटला?
img
Nandini khandare More


NEET  परीक्षा पेपरफुटी प्रकरण सध्या चर्चेत असून नीटपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांतापाची लाट पाहायला मिळाली आहे. दरम्यान , या प्रकरणातील मोठी अपडेट आता समोर आली आहे . 

या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर, गेल्या २४ तासांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयिताला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या २४ तासांपासून पोलिसांना गुंगारा देणारा संशयित धनंजय लोखंडे याला अखेर CBI ने अहिल्यानगरमधून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) ने आज सकाळी अहिल्यानगर येथून या दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले.

नाशिकमधील आरोपी खैरनार याचा साथीदार असलेला हा तरुण पुण्यात लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पुणे पोलीस त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत असतानाच, आज सकाळी CBI च्या पथकाने अहिल्यानगरमध्ये धाड टाकून या संशयिताला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

संशयिताने मंगळवार दुपारपासून आपला मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्याचं नेमकं लोकेशन समजण्यास अडचणी येत होत्या. 

मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे CBI आणि पोलिसांनी त्याचा मागोवा घेत ही कारवाई पूर्ण केली. पुणे पोलिसांनी या संशयिताच्या शोधासाठी शहरात मोठी शोधमोहीम राबवली होती. मात्र, तो अहिल्यानगरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच CBI ने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आता पेपरफुटीच्या रॅकेटमधील महत्त्वाचे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group