आगामी NEET परीक्षेत महत्त्वाचे बदल ! विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा
आगामी NEET परीक्षेत महत्त्वाचे बदल ! विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा
img
Nandini khandare More

नीट पेपरफुटी प्रकरणावरून संपूर्ण देशभरात गोंधळ निर्माण झाला होता . दरम्यान आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून आता काही बदल केले आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार , NTA ने मोठा निर्णय घेत, पुन्हा होणाऱ्या परीक्षांबद्दल मोठी माहिती दिली आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सोय लक्षात परीक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. NTA ने परीक्षेचा एकूण कालावधी वाढवून 195 मिनिटं केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. याव्यतिरिक्त, प्रश्नपत्रिकेत ‘रफ वर्क’ करण्यासाठी अधिक जागा दिली जाईल. NTA च्या मते, विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायावर आधारित आणि परीक्षा प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने हे बदल लागू करण्यात आले आहेत.

NTA ने सांगितल्यानुसार, NEET UG 2026 परीक्षेचा कालावधी वाढवून 195 मिनिटे करण्यात आला आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या कालावधीमध्ये अटेंडेंस शीट स्वाक्षरी करणे आणि परीक्षेसंबंधी इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचाही समावेश आहे.

विद्यार्थ्यांनाकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं NTA ने स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे त्यांच्या परीक्षेच्या वेळेवर कोणताही परिणाम होऊ नये, हे सुनिश्चित करणं हा यामागचा उद्देश आहे.

NEET UG 2026 ने परीक्षाकाळात रफ कामासाठी देखील बदल केले आहे. आता विद्यार्थ्यांना रफ कामासाठी म्हणजे कच्च्या कामासाठी, कॅलकुलेशन आणि आकृत्या काढण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक जागा दिली जाईल.

रफ वर्कसाठी नव्या पानाची व्यवस्था

यापूर्वी, कच्च्या कामासाठी फक्त केवळ प्रश्नपत्रिकेच्या शेवटचं एक पान दिलं जात होतं. आता, रफ कामासाठी प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीलाही पाने उपलब्ध असतील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार काम करण्यास मदत होईल.

NTA कडून विद्यार्थ्यांना सूचना

NTA ने उमेदवारांना ‘ॲडमिट कार्ड’ (प्रवेशपत्र) आणि इंफॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा तसेच परीक्षा केंद्रावरील नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, परीक्षा प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल करण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group