नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. गैरप्रकारामुळे हा पेपर रद्द करण्यात आला होता दरम्यान, आता पुन्हा एकदा परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरीही या सर्व प्रकारामुळे विद्यर्थ्यांना मोठा मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान आता या प्रकरणात आता मोठी कारवाई झाली असल्याची बातमी समोर यर्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणात आता सीबीआयला आणखी यश मिळाले आहे. सीबीआयने आता या प्रकरणात बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे यांच्या अटकेनंतर आता ही दुसरी मोठी कारवाई म्हटली जात आहे. सीबीआयच्या सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे आता प्रोफेसर आणि कोचिंग सेंटरशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात अटक केल्या मनिषा वाघमारे यांच्या चौकशीतून मनिषा मांढरे यांचे नाव समोर आले. मनिषा वाघमारे यांना सीबीआयने १४ मे रोजी अटक केली होती. जेव्हा तपासाची व्याप्ती वाढली तसे मनिषा मांढरे याचे नाव समोर आली. दोघींचा या प्रकरणात मोठा रोल आहे. सीबीआय आता मनिषा अंधारे यांच्या बँक खात्यांची आणि फोन कॉल्सचे डिटेल्स शोधून काढत आहेत.
मनिषा गुरुनाथ मांढरे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत. त्या सिनियर बॉटनी प्राध्यापक आहेत. त्यांनी एनटीएच्या वतीने नीट-यूजी 2026 परीक्षा प्रक्रियेत एक एक्सपर्ट म्हणून अधिकृतपणे सामील होत्या. एनटीए एक्सपर्ट पॅनलमध्ये असल्याने त्यांनी बॉटनी आणि झुलॉजीच्या प्रश्न पत्रिका सहज मिळाल्या.
दरम्यान , सीबीआयने या संपूर्ण रॅकेटचे कथित मास्टरमाईंट पी.व्ही.कुलकर्णी यांना लातूर येथून अटक केली. कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत. ते अनेक वर्षे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना प्रश्न पत्रिका सहज मिळणे शक्य होते. कुलकर्णी यांनी या ओळखीचा गैरवापर केला आणि संपूर्ण पेपर लीक केला.