नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.निकाल जाहीर होताच आता देशभरातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बंसल यांनी देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. दोघांनाही 720 पैकी 715 गुण मिळालेत. उत्कृष्ट कामगिरीमुळे दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होतोय. याशिवाय देशातील अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत चांगलं यश मिळवलंय.
यंदा भारतातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमधील 5,440 परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा घेण्यात आलीये. या परीक्षेला सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11.21 लाख उमेदवार एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
NTA ने निकाल नियोजित वेळेत जाहीर केला आहे. त्यामुळे मेडिकल प्रवेश प्रक्रिया आणि कौऊंसिलिंगचं वेळापत्रक वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. असं एजन्सीने स्पष्ट केलंय. तसंच सर्व उमेदवारांची मार्कशिट neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त.