Nashik : बिल्डरकडे मागितली 20 लाखांची खंडणी
Nashik : बिल्डरकडे मागितली 20 लाखांची खंडणी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती 15 दिवसांत न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी समीर श्यामराव केदार (वय 48) यांचे कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय आहे. त्यांनी सूर्यभान जाधव यांच्याकडून सन 2010 मध्ये जमिन खरेदी करुन तिचा व्यवहारही पूर्ण केला होता.

मधल्या काळात जाधव हे तुरुंगात होते. दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी सूर्यभान गयाजी जाधव व ओम्‌‍ सूर्यभान जाधव (दोघेही रा. पेठ गल्ली, गंगापूर गाव, नाशिक) हे दोघे जण केदार यांच्या कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादी केदार यांच्याकडे बेकायदेशीररीत्या 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, तसेच ही रक्कम 15 दिवसांत दिली नाही, तर मुलाला मारून टाकण्याची धमकी केदार यांच्या वडिलांना दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात  बापलेकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group